अमरावती जिल्ह्याच्या चांदूर रेल्वे येथे राहणारा नितेश उर्फ रितेश अशोकराव मेश्राम (वय 32, जिल्हा न्यायालयाने 13 जून 2024 रोजी नितेश मेश्रामविरुद्ध वॉरंट जारी केले होते. वॉरंट तामील करण्यासाठी चांदूर रेल्वे पोलिसांनी 10 जून रोजी रात्री त्याला अटक करून ठाण्यातील लॉकअपमध्ये ठेवले. 11 जून रोजी पहाटे दोन वाजता त्याची अटक दाखल करण्यात आली. पहाटेपासून दुपारपर्यंत त्याची देखरेख प्रविण मेश्राम, असीम गवळी, अमोल धोहे आणि प्रशांत डोके या पोलिसांकडे होती. सकाळी आठ ते दुपारी दोन दरम्यान आरोपीला लॉकअपमध्ये ठेवण्यात आले असताना त्याच्यावर मारहाण झाल्याचा संशय निर्माण झाला.
दुपारी आरोपीला न्यायालयात हजर करण्यासाठी बाहेर काढले असता त्याला चक्कर येऊन तो कोसळला. त्यानंतर त्याला ग्रामीण रुग्णालयात नेले असता उजव्या खांद्याचे हाड तुटल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मात्र, उपचाराऐवजी त्याला न्यायालयात नेण्यात आले. न्यायालयाने उपचाराची गरज लक्षात घेऊन त्याला रुग्णालयात दाखल करण्याचे आदेश दिले, पण उशिरा कारवाई झाली. अखेर 13 जून रोजी संध्याकाळी 5.वाजता च्या दरम्यान इर्विन रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला.
त्या नंतर न्यायालयीन चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपीला झालेल्या मारहाणीमुळेच मृत्यू झाल्याचे पोस्टमार्टम अहवालात स्पष्ट झाल्यानंतर अखेर चांदुर रेल्वे तत्कालीन ठाणेदारासह 10 पोलिसांवर कलम 302, 34 भादंवि अंतर्गत हत्येचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. फ्रेजरपुरा पोलिसांना न्यायालयाने गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले असता पोलीस निरीक्षक निलेश गावंडे व सहायक पोलीस उपनिरीक्षक मनोज काळबांडे यांनी 1नोव्हेंबर रोजी दोषी पोलीस अधिकारी व कर्मचारी विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा